Ad will apear here
Next
तरी बरं
‘एक वेळ पुस्तकं निराश करतात; पण माणसं आपल्याला कधीही निराश करत नाहीत. त्यांना निरखणं, त्यांची बोलणी कान देऊन ऐकणं, त्यांच्या वागण्याचा अन्वयार्थ लावणं, वरवरच्या विसंगतीत दडलेली सुसंगती समजून घेणं हे नेहमीच फार अर्थपूर्ण वाटतं,’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी त्यांच्या या कथासंग्रहामागची भूमिका व्यक्त करताना लिहिलेले हे मनोगत.

या मनोगतातूनच त्यांच्या या एकूण ११ कथा माणसांवर, माणसांच्या वागण्यावर, नात्यांवर आधारित आहेत. मध्यमवर्गीय घरांमध्ये घडणाऱ्या प्रसंगांमधून या कथा उलगडत जातात. ‘पडदा’ या कथेची सुरुवात राणी आणि प्रसन्नजीतच्या विवाहाच्या बातमीपासून होते. ही बातमी समजल्यापासून विवाह होईपर्यंत घडणारे नाट्यसंवाद, प्रसंगांमधून समोर उभे राहते. त्याचबरोबर नात्यांची गुंफण समोर येते. तशीच नात्यांची खोली दाखविणारी संजीवनी, धुरंधरची ‘शब्द’ ही कथा.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १६०  
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZSWBR
Similar Posts
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी
मॅन इटर्स अॅंड मेमरीज आजच्या काळात शिकारीला बंदी असली, तरी एक काळ असा होता, की त्या काळात मोठमोठ्या शिकारी करणे अभिमानास्पद मानले जात होते. त्या सुरस, रोमांचकारी कहाण्या रंगवून सांगितल्या जात. जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांनी अशाच काही सुरस शिकारकथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. लालू दुर्वे यांनी त्यांचा अनुवाद केला आहे. टर्नर
‘दिवाळी अंक म्हणजे दिवाळी’ ‘भाऊबीजेतून मिळालेल्या पैशांतून दिवाळी अंक विकत घेण्यात वेगळीच मजा होती. एकंदरच, सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा सण त्या वेळी खूप मौलिक होता, असं वाटतं...’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले सांगत आहेत त्यांच्या ‘आठवणीतल्या दिवाळी’बद्दल
आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान मुद्रा ही आसनाचे विकसित स्वरूप आहे आणि शरीर संपदेसाठी मुद्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे म्हणतात. डॉ. मधुकर कृष्णा देसले यांनी या पुस्तकात विविध मुद्रा आणि त्यांचे उपयोग सांगितले आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language